कोयना नगर हे महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात वसलेले एक गाव आहे. हे गाव ग्रामपंचायत क्षेत्रात येत असून गावाचा सर्वांगीण विकास ग्रुप ग्रामपंचायत गोकुळ तर्फे हेळवाक मार्फत केला जातो.
आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये पंचायत राज व्यवस्था हा एक अभिनव प्रयोग आहे. बलवंतराय मेहता समितीने ग्रामीण विकासासाठी सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याच्या उद्देशाने त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीची शिफारस केली.
त्या अनुसरून महाराष्ट्र शासनाने 1 मे 1962 रोजी महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, 1961 लागू केला. त्यानुसार जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद, गट पातळीवर पंचायत समिती आणि गाव पातळीवर ग्रामपंचायत अशा त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची स्थापना करण्यात आली.
स्व. यशवंतरावजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मे 1962 मध्ये सातारा जिल्हा परिषदेची स्थापना झाली. आज सातारा जिल्ह्यात ग्रामीण विकासासाठी 11 पंचायत समिती व 1495 ग्रामपंचायती कार्यरत आहेत.
शासनाच्या विविध योजना, अभियान व मोहिमा प्रभावीपणे राबविण्यात सातारा जिल्हा परिषद नेहमीच अग्रेसर राहिलेली आहे.